ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्याने मध्य प्रदेशात राजकीय भूकंप
मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूंकप होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. मात्र मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूंकप होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी भाजपाला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही असं म्हटलं आहे.“महाराष्ट्रात असं ऑपरेशन करायला भाजपाच्या राज्यातील आणि दिल्लीच्या नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील हे त्यांना माहित नाही. काही भाजपचे नेते यासाठी मुहूर्त शोधत आहेत. मुहूर्त शोधणं हे त्यांचं काम आहे. मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपाला घ्यायचा असेल तर एप्रिल, पाडवा काय दिवाळीपर्यंत घेतला तरी चालेल. पण तो मध्य प्रदेशाचाच घ्यावा लागेल. भाजपला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे .
previous post
next post