November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

मद्यधुंद ट्रक चालकाची दुचाकीला धडक; २ जण जखमी

खामगांव : येथील नांदुरा रोडवरील हॉटेल देवेंद्र समोरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वाराला मद्यधुंद टँकर चालकाने भरधाव वेगाने टँकर चालवून जोरदार धडक दिल्याची घटना काल रात्री ११:३० सुमारास घडली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहराकडून नांदुरा कडे जाणाऱ्या रोडवर एक टँकर चालक आपल्या ताब्यात असलेले टँकर क्रमांक एम एच-२८-बीबी- ३९६४ हा निष्काळजीपणे व भरधाव वेगाने टँकर चालवत नांदुरा रोडवरील हॉटेल समोर जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश नींबाळकर रा. घाटपुरी व सुरेंद्र जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील योगेश नींबाळकर याची प्रकृति चिंताजनक असल्याने त्याला अकोला रेफर करण्यात आले आहे. टँकर चालक हा मद्यधुंद असल्यामुळे त्याने टॅंकरसह घटनास्थळा वरून भरधाव वेगात काढला व जास्त मद्यधुंद असल्यामुळे सदर टॅंकर हा डीवाईडर वरून जाऊन नांदुरा रोडवर असलेल्या गौरव हॉटेल जवळील पानपट्टी व सलूनच्या आत मध्ये घुसला. यावेळी घरगुती वायर सुद्धा ट्रकमध्ये गुंतल्या होत्या मात्र त्या ठिकाणी कोणी नसल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मद्यधुंद चालकास पोलिसांनी टँकर मधून बाहेर काढले होते. ट्रक चालक सुद्धा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे भरधाव वेगाने आलेल्या या टँकरने संपूर्ण पानटपरीचे ५ लाख रु. व सलूनचे ६ लाख रु. तसेच हॉटेल गौरवच्या भिंतीचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी टँकर चालक राजेंद्र यादव वय ३२ रा. बानासो, ता. विष्णुगड, झारखंड याच्या विरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८,४२७ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडले

nirbhid swarajya

Barely Into Beta, Sansar Is Already Making Social VR Look Good

admin

तांदूळाच्या काळाबाजाराची सीआयडी मार्फत चौकशी होणार –छगन भुजबळ

nirbhid swarajya
error: Content is protected !!