शेगाव : शेगांव-कालखेड मार्गावर सकाळी ९:३० च्या सुमारास परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या मिनीडोअर चा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २५ मजूर जखमी झाले असून यातील दोन गंभीर जखमी जखमी झाले आहे.गंभीर जखमी रुग्णाना तात्काळ त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताने पुन्हा एकदा मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मजुरीसाठी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात ५० च्या जवळपास आलेले मजूर शेगाव तालुक्यातील मानेगाव येथे राहत होते. दरम्यान आज मंगळवारी सकाळी कालखेड रोडवरील एका शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी मिनीडोअर ने जात असतांना शहरानजीक यादव बेकरिच्या जवळ काही अंतरावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिनीडोअर उलटले यामध्ये २५ मजूर जखमी झाले आहे.
जखमींना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्नालयात हलविण्यात आले. मात्र सईबाई मोटे हाँस्पिटल मधील तज्ञ डाँक्टर नेहमी प्रमाणे गायब होते. येथील अधिकारी व महत्वाचे डाँक्टर मुख्यालयीन राहत नसल्यामुळे रुग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकाची मागणी आहे.