November 20, 2025
आरोग्य जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र विदर्भ शेतकरी

मकावर औषधी टाकतांना 5 जणांना विषबाधा;एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू,

3 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

बुलढाणा:मकाच्या कंसात कीड लागू नये म्हणून अनेक शेतकरी त्यात प्युरी टाकत असतात.काल गुरुवारी धामणगाव बढे येथील आपल्या शेतात मकाच्या कंसात प्युरी टाकत असताना विषबाधा होऊन एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला असून 3 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या ग्राम धामणगाव बढे येथील दामोदर नारायण जाधव वय 60 वर्ष व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य आपल्या शेतात 18 जुलै रोजी गेले होते.

यावेळी ते शेतातील मकाच्या कंसात कीड होऊ नये म्हणून प्युरी टाकत असताना काही जणांना मळमळ व उलट्या होऊ लागले.तात्काळ नातेवाईकांनी त्यांना धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. दामोदर नारायण जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले आहे तर मोहन देवानंद जाधव वय 12 वर्ष, बेबीबाई शिवाजी जाधव वय 57 वर्ष आणि सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वय 60 वर्ष यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.अशी माहिती नातेवाईक राजेश जाधव,नातेवाईक यांनी दिली

Related posts

एस टी बस व ४०७ ची समोरा समोर धडक ; एकाचा मृत्यु तर १६ जखमी

nirbhid swarajya

वंचितचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांचा वाढदिवस साजरा

nirbhid swarajya

वीज कोसळल्याने लाखोंचे नुकसान; भरपाई देण्याची मागणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!