सरकारने अँड.बाळासाहेब आंबेडकर व हजारो वारकऱ्यांनावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.
वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंट्री बोर्डे सदस्य अशोक सोनोने यांचे प्रतिपादन
खामगांव : महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली. खरं तर हा मुद्दा सर्वप्रथम राज्यातील वारकरी संप्रदायाने लावून धरला होता. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुखमाई मंदिर उघडण्यासाठी वारकरी संप्रदाय व वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यान समवेत आंदोलन सुद्धा केलं, आणि राज्यातील पाहिलं मंदीर भक्तासाठी खुले करून दिले. यावेळी हजारो कार्यकर्ते व वारकऱ्यांनावर पंढरपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले. आता मात्र सरकारने ऍड बाळासाहेब आंबेडकर व हजारो वारकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीचे पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अशोक सोनोने यांनी केली आहे.राज्य सरकारने मंदिरे उघडण्यासाठी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचे आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे स्वागत करतो आणि मुख्यमंत्री यांनां धन्यवाद सुद्धा देतो. मंदिरे उघडण्यास आघाडी सरकारने दिलेली परवानगी म्हणजे वारकरी व भक्तांच्या विजय आहे. असे ही अशोक सोनोने यांनी म्हंटलंय.