खामगांव : तालुक्यातील अड़गाव येथील मंडळ अधिकारी विजय कुलकर्णी यांचे आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास अकोला येथे कोरोनामुळे निधन झाले आहे.विजय कुलकर्णी हे खामगांव तालुक्यातील अड़गाव येथील मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांची तबियत ठीक नसल्याने त्यांनी सुट्टी टाकून अकोला येथे भरती झाले होते. मात्र आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. विजय कुलकर्णी यांची कारगिर्द खामगांव तहसील मधे अत्यंत चांगली होती. शांत व संयमी असा त्यांचा स्वभाव होता. कोरोनाचे संकट पाहता त्यांचा अंत्यविधी अकोला येथेच करण्यात आला. त्यांच्या पश्च्यात पत्नी व दोन मुले व आप्त परिवार आहे. निर्भिड स्वराज्य कडून मृतआत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजलि..
previous post