December 29, 2024
बुलडाणा

भेसळ करणाऱ्या डांबर प्लँट वर पोलिसांचा छापा : १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ३ अटकेत

खामगाव : शहरालगत असलेल्या एमआयडीसी मध्ये एका डांबर प्लँट मध्ये नकली डांबर तयार केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन बुलडाणा येथील स्थानिक  गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत 14 लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. तर 3 आरोपींना अटक करण्यात यश मिळाले असून १ आरोपी फरार झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव एमआयडीसी मध्ये रस्ते तयार करण्यासाठी कामी येणाऱ्या डांबर मध्ये  भेसळ केल्या जात असल्याची  माहिती पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे तक्रारी द्वारे करण्यात आली होती याबाबत पोलिस महासंचालकांनी बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना ई-मेल द्वारे सदर घटनेची माहिती कळवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने पोलीस उपनिरीक्षक इम्रान इनामदार यांच्या नेतृत्वात खामगाव येथील एमआयडीसीमधील मिथुन मसाला पापड या ठिकाणी धाड टाकली असता या युनिटमध्ये हे शुद्ध डांबर मध्ये मार्बल पावडर मिसळून भेसळ करीत असल्याचे निरीक्षणात आल्यावरून याठिकाणी सोनू बळीराम सरोज, बबलू पंढरीनाथ महाजन, मिथुन सुखदेव कळसकार या तिघांना ताब्यात घेण्यात आले यावेळी डांबर भेसळ साठी वापरल्या जाणाऱ्या बॉयलर मिक्सर लोखंडी बॅनर पांढऱ्या रंगाची मार्बल पावडर शंभर किलो आणि एका ट्रकसह १४ लक्ष ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजी नगर खामगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण कटक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विरोधात कलम ४२०, ४०८,४११ ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सर्फराज अहेमद रमझान अहेमद रा. सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश हा फरार आहे.  हि कारवाई पोउपनि इम्रान इनामदार, पो.को लक्ष्मण कटक,रघुनाथ जाधव, आणि संभाजी आसोलकर यांनी पार पाडली.खामगाव विभागातील हि दुसरी मोठी कारवाही आहे. डांबर मध्ये भेसळ प्रकरण गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू होती..या आधी शेगाव तालुक्यातील जलंब पोलिस स्टेशन हद्दीत झाली होती.Attachments area

Related posts

आपल्या खामगावच्या विद्यार्थ्यांचा शितल अकॅडमीच्या माध्यमातून राज्यस्तरावर यश…

nirbhid swarajya

उमेदच्या महिलांचा गावागावात एल्गार

nirbhid swarajya

“स्व.भाऊसाहेब फुंडकर स्मृती कृषी सेवा कार्य गौरव पुरस्कार २०२१” जाहीर

nirbhid swarajya
error: Content is protected !!