January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

भुखंड घोटाळ्यातील आरोपी विरूध्द आणखी दोन गुन्हे दाखल

खामगाव : शहरातील बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील आरोपी तसेच हॉटेल व्यवसायिक प्रदीप राठी याच्यावर नकली मुद्रांक बनावट दस्तऐवजाद्वारे खरेदीखत नोंदवून भूखंड घोटाळा केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आज २९ एप्रिल रोजी खामगांव शहर पोलीस स्टेशन मधे प्रदीप राठी याच्यावर फसवणूकीचे आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत डॉ. आशिष रमेश अवस्थी रा. मेहकर यानी पोस्टेला दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, माझे वडील रमेश अवस्थी हे हयात असताना त्यांनी खामगाव लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन खामगाव चे भागीदार प्रदीप प्रेमसुखदास राठी, राजेंद्र प्रेमसुखदास राठी, नरेंद्र सुरजमल संकलेचा, अनिल हरिकिशन नावंदर सर्व रा.खामगाव यांनी भागीदारी फर्म स्थापन करून नगर परिषद खामगाव हद्दीबाहेरील शेत सर्वे नंबर १३६ मध्ये उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या आदेश क्रमांक काढण्यात आलेल्या लेआउट ज्याचे नाव लक्ष्मीनगर प्लॉट नंबर ७६ विकत घेण्याचा दिनांक १४-०९-१९८२ रोजी सौदा पक्का करून ३१-१२-१९८२ च्या आत खरेदी करून घेण्याचा करारनामा अनिल हरिकिसं नावंदर यांनी करून दिला होता. ठरल्या प्रमाणे भागीदारी फर्म चे वतीने प्रदीप प्रेमसुख दास राठी यांनी दुय्यम निबंधक कार्यालय खामगाव येथे २४-१२-१९८२ रोजी रजिस्टर खरेदीखत करून दिले होते. खरेदीखतावर साक्षीदार म्हणून भागीदारी फर्मचे नरेंद्र सुरजमल संकलेचा यांनी सही केली होती. तेव्हापासून सर्व प्लॉटची मालक मी व माझा भाऊ गिरीश अवस्थी आहोत. माझ्या वडिलांनी सदर प्लॉटची तलाठी रेकॉर्डला नोंद होणे करिता तत्कालीन तलाठी यांच्याकडे खरेदी खताची छायांकित प्रत व अर्ज दिला होता. त्यावर नोंद झाली असल्याचे गृहीत धरून व घरातील व्यवहार करणारे माझे मोठे भाऊ पाहतात. मात्र माझे भाऊ गिरीश अवस्थी हे भारतीय वायु सेनेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांची सतत बदली होत असल्याने आम्हाला प्लॉट क्रमांक ७६ चे सातबारा उतारा व फेरफार चे काम न पडल्यामुळे दिनांक २४-११-२०१५ रोजी मी वकिलामार्फत खामगांव मधील लोकल पेपर ला मालमत्तेबाबत आमची ताबा जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती. असे असताना १८-३-२०२१ रोजी एका पेपरच्या अकोला बुलढाणा आवृत्तीच्या बुलढाणा पानावर एडवोकेट दिनेश वाधवणी यांनी पक्षकारांकरीता मोहम्मद अलीम मोहम्मद सलीम व आतेका फिरदोस मोहम्मद अलीम यांच्याकडून सदर चा प्लॉट ७६ हा खरेदी करणेबाबत करार करीत असले बाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती. यामध्ये कोणाचा आक्षेप असल्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा असे नमूद केले होते. याकरिता या जाहीर नोटीस खुलासा आमच्या वकिलामार्फत २०-३-२०२१ रोजी आम्ही वृत्तपत्रद्वारे व स्वतः वकिलांनी पत्र देऊन केला आहे. त्यानंतर माहिती घेतली असता ऑनलाईन सातबारा इतर कागदपत्र मोहम्मद अलीम मोहम्मद सलीम व अतिका फिरदोस मोहम्मद अली यांच्या नावाने आढळून आली. तसेच पोलीस चौकशी मध्ये सुद्धा खामगाव येथील प्रदीप राठी यांचे भूखंड माफिया म्हणून अनेक व्यवहार केलेले आहे व माझे वडील स्वर्गीय रमेश अवस्थी यांनी २४-१२-१९८२ रोजी त्यांच्याकडून रजिस्टर खरेदी खत आधारे केलेली प्लॉट क्रमांक ७६ बाबत त्यांना माहिती असताना सुद्धा व त्या प्लॉटवर हक्क नाही हे माहित असताना सुद्धा सदर प्लॉट परस्पर विक्री त्यामुळे त्यांनी माझा विश्वासघात करून माझी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार डॉ.आशिष अवस्थी यांनी केली आहे. प्रदीप राठी विरुद्ध दुसऱ्या तक्रारींमध्ये शिवशंकर गुरुदेव शुक्ला रा.अमरावती यांनी सुद्धा अशीच तक्रार प्रदीप राठी यांच्याविरुद्ध केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की ते खामगाव येथे जलसंपदा विभागामध्ये कार्यरत असताना खामगाव लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन खामगाव च्या साक्षीदारांनी शेत सर्वे नंबर १३६ यातील लक्ष्मी नगर मधील प्लॉट क्रमांक ७७ याची १४-९-१९८२ रोजी सौदा पक्का करून ठरल्याप्रमाणे २४-१२-१९८२ रोजी खरेदीखत करून दिले होते. प्लॉटची रेकॉर्डला नोंद होण्याकरता तत्कालीन तलाठी यांच्याकडे खरेदीखताची छायांकित प्रत व अर्ज दिला होता. मात्र त्यानंतर मला माझ्या प्लॉट क्रमांक ७७ च्या सातबारा उतारा व फेरफार चे काम न पडल्याने मी तो कधी काढला नाही. सदर फ्लॅटचे मालक आपणच आहोत असे समजून नोंद झाली असल्याचे गृहीत धरून मी त्याकडे लक्ष दिले नाही. याच गोष्टीचा फायदा घेत भागीदारी फर्म चे प्रदीप राठी यांनी वरील बाबींचा गैरफायदा घेऊन प्लॉट क्रमांक ७७ सन २०१५ मध्ये तलाठी रेकॉर्डवरील त्यांच्या नावाचा सातबारा फेरफार काढून माझ्या नावाने असलेला प्लॉट हा त्यांनी गणेश शिवाजी गायकवाड व श्रीमती उमाबाई नामदेव ढोरे दोघेही रा.खामगाव यांना २०१५ रोजी निबंधक कार्यालय खामगाव येथे विक्री केला आहे. त्यामुळे त्यांनी माझी सुद्धा २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. असे असलेले प्लाँट हा आरोपी याने परस्पर विश्वासघत करून बेकायदेशीर पणे प्लॉट चे विभाजन करून परस्पर इतराना विकुन बनावट पणे स्वतःचा प्लाँट असल्याचे भासवुन अवस्थी व शुक्ला यांची ४७ लाखाने फसवणुक करून विश्वासाघात केला. या तक्रारीवरून राठी यांच्या विरुध्द कलम ४०६, ४२० भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगांव शहर पोलीस करत आहे.

Related posts

सौर ऊर्जा व इलेक्ट्रिक लाईट तात्काळ सुरू करावे-आझाद हिंद संघटनेची मागणी

nirbhid swarajya

पर्यायी पूल गेला वाहून ; ट्रॅक्टर बचावला

nirbhid swarajya

रागाच्या भरात मनोरुग्न मुलाकडून वडिलांचा खून

nirbhid swarajya
error: Content is protected !!