भुखंड घोटाळ्यातील आरोपी प्रदीप राठीने ३ खरेदीचे व्यवहार करून केले आत्मसमर्पण की पोलिसांनी केले मॅनेज अटक ?
खामगांव : शहरातील बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील आरोपी तसेच हॉटेल व्यवसायिक प्रदीप राठी याच्यावर नकली मुद्रांक बनावट दस्तऐवजाद्वारे खरेदीखत नोंदवून भूखंड घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून प्रदीप राठी हा फरार होता मात्र आज खामगाव येथे एका खरेदी संबंधात दुय्यम निबंधक कार्यालयाचे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आज बुलढाणा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले ती त्याने खरेदीचे तीन व्यवहार करून आत्मसमर्पण केले ? याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळण्यासाठी त्याने याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली होती मात्र ती फेटाळण्यात आली होती. टेंभूर्णा शिवारातील १४ प्लॉटसाठी स्वतःच्या घरी नकली मुद्रांक तयार करणे त्याद्वारे बनावट व खोटे दस्तावेज तयार करणे विविध शासकीय अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के सह्या करून खरेदी खत नोंदवून १ कोटी ६४ लाख रुपयांची प्रदीप राठी यांनी फसवणूक केल्याची तक्रार अंजू लवकेश सोनी यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. सोनि यांचे पती लोकेश सोनियांचा २००७ मध्ये मृत्यू झाला.मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांनी १४ डिसेंबर २००० मध्ये वल्लभदास राठी यांच्याकडून टेंभूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २४ मधील दहा प्लॉट विकत घेतले होते. लवकेश सोनी यांच्या निधनानंतर प्रदीप राठी यांनी २००७ ते २०२१ दरम्यान लवकेश सोनी यांच्या नावावर असलेले टेंभुर्णा शिवारातील १४ प्लॉट बनावट दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री केली. त्याद्वारे १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची श्रीमती सोनि यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदर गुन्हा हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला त्यावेळी राठी यांनी खामगाव येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता मात्र तो सुद्धा फेटाळण्यात आला होता. तेव्हापासून प्रदीप राठी हे फरार होता.त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम जामीनासाठी अर्ज केला मात्र तो सुद्धा फेटाळण्यात आला होता. प्रदीप राठी यांनी आज दिवसभरामधे खामगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी करुन व्यवहार केला असल्याची माहिती सुद्धा सुत्रांनी सांगितले आहे. एखादा आरोपी खामगाव शहरात येऊन सरकारी कार्यालयात खरेदीचे व्यवहार करतो तरीसुद्धा पोलिसांना याची कुठलीही भनक नसते. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे किंवा अर्थपूर्ण सहकार्य तर नाही अशी चर्चा खामगाव शहरात दुपारपासुन रंगू लागली आहे. सकाळपासून ते दुपारपर्यंत खरेदीचे व्यवहार करून आरोपी मोकाट फिरत असतो मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसते तसेच निबंधक कार्यालय-२ मध्ये आरोपी खरेदीचे व्यवहार करतो व दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी त्याला मदत सुद्धा करतात हे नवलच म्हणावे लागेल. याबाबत अधिक माहितिसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी दिगंबर अंभोरे व पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मात्र दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला याची विचारणा केली असता असे काही घडलेच नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे आज सर्व घडलेली घटना आर्थिक गुन्हे शाखेच्या संमतीने तर होत नाहीत ना अशी चर्चा सुद्धा खामगाव शहरातील नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे संशयाची सुई आर्थिक गुन्हे शाखेकडे जात आहे.