April 18, 2025
खामगाव जिल्हा नागपुर बातम्या बुलडाणा

“भारत जोडो यात्रा” कॉंग्रेस सेवादलाची नियोजन बैठक संपन्न

“हीच वेळ सामर्थ्य दाखविण्याची, एकरूप होऊन भाजपा विरोधात लढण्याची” विलासबाप्पू औताडे प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस सेवादल

खामगाव : “हीच वेळ आहे सामर्थ्य दाखवून, एकरूप होऊन भाजपा विरोधात लढण्याची, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला एकसंघ, एकात्मतेच्या धाग्यात सर्वधर्म समभावाची नाळ जोडून खर्‍या अर्थाने बांधून ठेवले. परंतु भाजपा सत्तेवर आल्यावर ज्या संस्था गेल्या ७० वर्षात उभ्या केल्या त्या सर्व संस्था आपल्या मित्रांना विकण्याचा घाट या सरकारने घातला आहे. विविध धर्मामध्ये जातीयतेढ निर्माण करीत सार्वजनिक विषमता निर्माण केल्या जात आहे, आणि म्हणूनच मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात “भारत जोडो” यात्रा कन्याकुमारी ते कश्मीर पर्यन्त काढण्यात येत आहे.” असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष मा.श्री. विलासबापू औताडे यांनी शेगाव येथे आयोजित तीन जिल्ह्याच्या नियोजन बैठकीत केले.
मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघलेली “भारत जोडो यात्रा” नोव्हेबर मध्ये महाराष्ट्रातून विशेषता: बुलढाणा जिल्ह्यातून जाणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष विलासबापू औताडे, प्रदेश प्रभारी मा. लालजी मिश्रा, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. सविताताई जाधव, मा.श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष श्री. अजाबराव पाटील, राजेश्वर देशमुख, बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, अकोला जिल्हाध्यक्ष विजय शर्मा, जळगाव जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष डॉ. ऐश्वर्या राठोड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये “भारत जोडो यात्रेची” नियोजन बैठक पार पडली. यावेळी आपल्या प्रस्ताविकामध्ये बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी “मा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेची मूळ संकल्पना विषद केली, तसेच “भारत जोडो यात्रा” नियोजनबद्धं पद्धतीने कशी होईल याबाबत मार्गदर्शन केले”. यावेळी जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सचिव यांनी आपली सूचना बैठकीमध्ये मांडल्या. यावेळी “भारत जोडो पदयात्रेमध्ये सामील होण्यासाठी जनतेमध्ये आपला संदेश घेऊन जाण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष यांनी यावेळी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख, माजी नगराध्यक्ष शैलेन्द्र पाटील, प्रदेश संघठण सचिव शाम डाबरे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार, जिल्हा सचिव सौ. कविताताई राजवैद्य, अमरावती विभागीय यंग ब्रिगेड अध्यक्ष टोनू सावजी, बुलढाणा जिल्हा यंग ब्रिगेड अध्यक्ष अमित तायडे, संगरामपूर तालुकाध्यक्ष शिवकुमार गिरी, नंदुरा तालुकाध्यक्ष विणलकुमार मिरगे, जळगाव जा. शहराध्यक्ष अंसार बाबू शेख, शेगाव तालुकाध्यक्ष अनिल सावळे, महकर तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख, डॉ. नितिन चव्हाण, संतोष थाटे तेल्हारा, राजेश गांवडे पातूर, मिलिंद जैस्वाल, गोविंद देशमुख, शिवाजीराव बुरुंगले, दीपक सलामपुरीया, श्री, मानेजी, प्रल्हाद राऊत, तेजराव पहुरकर, कैलासबाप्पू देशमुख, किसान धुर्डे, प्रमोद धुले, लक्ष्मणराव गवई, दिलीप पटोकार, राजेश्वर गावंडे, प्रकाश शेगोकर, उज्ज्वल देशमुख, एन.एस.यू.आय. खामगाव तालुकाध्यक्ष साहिलबाप्पू देशमुख, संतोष चव्हाण, युवक कॉंग्रेस चे पवन पचेरवाल, राहुल अग्रवाल, सूदाम जाधव, विकास पल्हाडे, विशाल कोल्हे, छोटू राजपूत, नीलेश काटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. “भारत जोडो यात्रा” नियोजन बैठकीचे सूत्रसंचालन विकास पल्हाडे तसेच आभार प्रदर्शन महकर तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केले.

Related posts

वडिलांनंतर तरुण मुलाचाही कोरोनाने मृत्यू

nirbhid swarajya

Android Co-founder Has Plan To Cure Smartphone Addiction

admin

Tech News | This Is Everything Google Knows About You

admin
error: Content is protected !!