शेगाव :- रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी 75 व्या भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवा चे औचित्य साधून पंचायत समिती व सरपंच संघटना तसेच सर्व संवर्गातील कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले . या शिबिरात तब्बल 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले . 75 व्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त 75 रक्त बॅगचे संकलन करून एका चांगल्या प्रकारे अमृत महोत्सव दिन साजरा केला . तर या 75 रक्तदात्यांमध्ये जवळपास 30 ते 35 रक्तदात्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केल्याचे दिसून आल्याने आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व हेच या शिबिराचे हे खास वैशिष्ट्य ठरले . या रक्तदान शिबीरासाठी शेगांव पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.सतीश देशमुख साहेब,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.चव्हाण साहेब ,विस्तार अधिकारी शेख साहेब ,सरपंच संघटना तालुकाध्यक्ष श्री.रामाभाऊ थारकर , ग्रामसेवक संघटना सचिव श्री. मनीष रोडे व तालुका समन्वयक श्री.रुपेश बायस्कर तसेच सर्व संवर्गातील कर्मचारी श्री.सईबाई मोटे येथिल कर्मचारी यांनी संकलन केले व विशेष सहकार्य केले…