January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

भाजपची ज्ञानेश वाकुडकर विरोधात पोलिसात तक्रार


खामगाव: भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर यांचेवर तातडीने गुन्हे दाखल करा अश्या मागणी ची तक्रार आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनात भाजपच्या वतीने खामगाव पोलिसांना दिली.देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी , समाजासाठी दिले. अश्या आदर्श पुरुषांबद्दल तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर रा नागपूर याने त्यांच्या चरित्राबद्दल अतिशय घृणास्पद लिखाण केले. त्यांची तुलना मंत्री धनंजय मुंडे यांचेसह केली. विदर्भ मतदार या वृत्तपत्रात त्यांचा याबाबत लेख प्रकाशित झाला. यावर न थांबता याने सदर लिखाण व्हाट्सएप व विविध सोशल मीडियावर पसरविले. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात असे लिखाण म्हणजे देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराचा अपमान आहे. आम्ही सर्व त्यांची प्रेरणा घेऊन काम करत आहोत, ते आमच्यासाठी देवाप्रमाणे आदर्श आहेत , त्यांच्या विरोधात अश्या प्रकारच्या अपमानास्पद लिखाणामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. अश्या विकृत मानसिकता असलेल्या ज्ञानेश वाकुडकर याच्या तीव्र शब्दात निषेध करीत असून संपूर्ण भारताच्या नागरीकांच्या भावना दुखवणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्याला अटक करा अशी तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनात भाजपा च्या वतीने खामगाव शहर व खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. खामगाव ग्रामीण पोस्टला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, डॉ एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, सरचिटणीस शांताराम बोधे, ज्ञानदेवराव चिमनकार, केशवराव मेहसरे, सुरेंद्रकुमार पुरोहित, मगन चौधरी, तर खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित , नगराध्यक्षा सौ अनिताताई डवरे, माजी न प उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार,कृ उ बा स सभापती संतोष टाले, न प आरोग्य सभापती राजेंद्र धानोकार, नगरसेवक सतीशअप्पा दुडे, सौ दुर्गाताई हत्तेल,सौ शिवानी कुळकर्णी, संदीप वर्मा, महिला आघाडी प्रदेश सदस्य सौ अनिताताई देशपांडे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, नागेंद्र रोहनकार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, तालुकाध्यक्ष राजकीरण पाटील, शहराध्यक्ष शुभम देशमुख, विनोद टिकार, अँड मधुसूदन शर्मा, अशोक मानकर, विजय उगले, रामेश इंगळे, सुभाष इटणारे, अमोल राठोड, जितेंद्र मेहरा, बजरंग लोंडे,गोलू आळशी,हितेश पदमगिरवार, विकास चौरे, श्रीकांत जोशी, विक्की रेठेकर, अँड दिनेश वाधवानी, रोहन जैस्वाल, विनय शर्मा, विक्की हत्तेल,पवन तनपुरे, आकाश मिश्रा, रोशन गायकवाड, गजानन मुळीक, प्रतीक झुणझुणवाला, चैतन्य बारगळ, प्रतीक मुंढे, सोनू नेभावाणी, अमोल लाहुडकार, मयूर घाडगे, पंकज भालेराव, अभिषेक भिसे, अभिषेक जगताप, संजय भागदेवानी, यश आमले, मयूर मुधोळकर, प्रसाद एदलाबादकर, प्रवीण पानझाडे, हृषीकेश पाटील, मंगेश सावरकर, अजय ठाकूर, सोनू तिवारी, नितीन पोकळे, परितोष डवरे, आदित्य केडीया, बंटी खंडेलवाल, आशिष सुरेखा ,आकाश भडासे आदी भाजपा तालुका, शहर, भाजयुमो, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

बालकांना अतिसारापासून रोखणार; ओआरएस, झिंक गोळ्यांचे वाटप होणार !

nirbhid swarajya

राष्ट्रवादी युवक काँग्रेस खामगाव शहर व तालुका तर्फे पंतप्रधानांना पत्र

nirbhid swarajya

संचारबंदी दरम्यान मलकापूर पोलीसांची मोठी कारवाई

nirbhid swarajya
error: Content is protected !!