खामगाव: भाजपची बुलंद तोफ नवनियुक्त भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा यांचं खामगाव आगमन प्रसंगी 7 नोव्हेंबर रोजी जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले चित्राताई वाघ यांची महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागताच त्यांनी महाराष्ट्र दौरा बुलढाणा जिल्ह्यातून सुरू केला. रात्री खामगाव विश्राम गृह येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ. अँड आकाश फुंडकर, भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर, जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, डॉ एकनाथ पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महिला आघाडी प्रदेश सदस्या तथा बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या जिल्हा संयोजिका सौ अनिताताई देशपांडे,माजी जि प अध्यक्षा सौ उमाताई तायडे, माजी प स सभापती सौ उर्मिलाताई गायकी, सौ रेखा मोरे, नगराध्यक्षा सौ अनिताताई डवरे, महिला अल्पसंख्याक आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रुबिना पटेल, सौ ज्योती तांदळे,जि प सदस्या सौ स्वातीताई देवचे, सौ जयश्रीताई टिकार, सौ जान्हवी कुळकर्णी, नगरसेविका सौ शिवानी कुळकर्णी, सौ लताताई गरड, भाग्यश्री मानकर, महिला आघाडी शहराध्यक्षा सौ रेखा जाधव, माजी प स उपसभापती सौ शीतल मुंडे, सौ रत्नाताई डिक्कर, सौ संगीता उंबरकार, भक्ती वाणी, शिवसेनेच्या सौ जयश्री देशमुख,जितेंद्र पुरोहित, नगेंद्र रोहनकार, विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, विनोद टिकार, विजय महाले, अंबादास उंबरकार, युवराज मोरे, अशोक हत्तेल, नागो वाघ, आशिष सुरेका, गोलू आळशी, रोशन गायकवाड, विक्की हत्तेल, मयूर घाडगे, रुपेश शर्मा, आकाश बडासे,संजय गुप्ता,नितीन लहुडकार, गुलजमा शाह, परितोष डवरे,आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चित्राताई वाघ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी चित्राताई वाघ यांनी महिला व युवती आघाडी पदाधिकारी,महिला लोकप्रतिनिधी यांचेशी विस्तृत संवाद साधला .