खामगांव : आ.तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप महिला आघाडीच्या वतीने राज्य सरकारला तहसील कार्यालयामार्फत आज निवेदन देण्यात आले.राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक ठिकाणी बलात्कार ,अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अती संवेदनशील काळातही शासनाच्या कोविड सेंटर व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. या वरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत उदासीन,असंवेदनशिल व निष्क्रीय असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे हया बिघाडी सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आजच्या या आक्रोश आंदोलनात महिलां मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत दयनिय झालेली असून राज्यात महिला हया शासनाव्दारे स्थापन केलेल्या कोव्हीड सेंटरमध्येच सुरक्षीत नाही त्यामुळे संपुर्ण राज्यात महिलांच्या सुरक्षेची काय अवस्था असेल हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे दिनांक १२ आक्टोंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.सर्व महिला आघाडी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना नायब तहसीलदार जगताप मॅडम ह्यांना निवेदन देण्यात आले. ह्यावेळी प्रदेश कार्यकारिणीच्या अनिता देशपांडे, नगराध्यक्ष अनिता डवरे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ उर्मिला गायकी,शहराध्यक्ष रेखा जाधव,जान्हवी कुळकर्णी,दुर्गा हट्टेल,लता गरड, भारती गलांडे, लक्ष्मी मिश्रा, स्नेहा चौधरी, भक्ती वाणी, संतोष पुरोहित, रत्नमाला पिंपळे, शिवानी कुलकर्णी, शितल मुंडे, रेखा भोरे, बोर्डे काकू, श्रद्धा धोरण, शिवानी कुलकर्णी, चंद्रशेखर पुरोहित सुरेश गव्हाळ, शरदचंद्र गायकी, संजय शिंनगारे,डॉक्टर एकनाथ पाटील,समाधान मुंडे,राम मिश्रा, जितेंद्र पुरोहित यांचेसह मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
previous post
