२०१६ मधील गणेश मूर्ति विटंबना प्रकरण
खामगाव : पालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीविसर्जन उपक्रमानंतर गणेश मूर्तीचीविटंबना झाल्याप्रकरणी भाजपनगरसेवक ओम शर्मा यांनी २०१६ लाशिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्येखोटी तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी डी. ई. नामवाड यांनी नागपूरखंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या बाजूने निकाल देताना खंडपीठाने नगरसेवक शर्मा यांना एक लाखाचा दंड ठोठावला. हे फौजदारी प्रकरण एखाद्या व्यक्तीविरुध्द बदला घेण्याकरीता वैयक्तिक राग असल्यामुळे जाणुनबुजुन द्वेषाने फिर्याद दाखल केली असून, यामुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसल्याचा युक्तिवाद सुनावनी वेळी याचिकाकर्त्या तर्फे करण्यात आला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. खामगाव पालिकाने पर्यावरण पुरक व जलसंवर्धन करण्यासाठी चांगला उपक्रम राबविला; परंतु त्या कामास सुरुंग लावण्यासाठी ओमप्रकाश शर्मा यांनी राजकीय हेतुने प्रेरीत होऊन तक्रार केली होती. तत्कालीन विधान परिषद सदस्य कै. पांडुरंग फुडकर यांनी सभागृहात लक्षवेधी लावल्याने नामवाड यांचे निलंबनही झाले होते.
प्रकरणी झालेली नुकसानीची आकारणी म्हणून ओमप्रकाश शर्मा यांनी नुकसान भरपाईची रक्कम म्हणून १ लाख रुपये दंड नामवाड यांना सवंग प्रसिद्धीसाठी खोटी तक्रार देणाऱ्या नगरसेवक ओम शर्मा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीसह फौजदारी स्वरुपाच्या कारवाईसाठी तक्रार दाखल करणारआहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला आहे. बाप्पाने चुकीच्या लोकांना शिक्षा दिली, याचे समाधान आहे.अशोकसिंह सानंदा माजी नगराध्यक्ष, खामगाव द्यावा. तो न भरल्यास फौजदारी संहितेच्या कलम ४२१ नुसार कारवाई करावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती सुनील बी.शुक्र व न्यायमूर्ती माधव जामदारयांच्या समक्ष सुनावणी झाली.नामवाड यांच्यातर्फे अधिवक्ता ए एम. घारे यांनी काम पाहिले.याविषयी निर्भिड स्वराज्य ने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे तसेच खोटी तक्रार देणाऱ्या विरोधात आम्ही अब्रु नुकसानीसह फौजदारी कारवाईसाठी तक्रार दाखल करणार आहे. गणपती बाप्पाने खोटी तक्रार करणाऱ्यांना ही चपराक दिली आहे.