खामगाव : महाराष्ट्र पोलीस तसेच भारतीय सेना मध्ये भरतीसाठी अनेक गरजू उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्रास होत आहे. याची दक्षता घेऊन भाजप कार्यालयात आज २९ व ३० नोव्हेंबर रोजी मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याचा उपक्रम ठेवण्यात आला आहे. भाजप जिल्ह्याध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे आदेशानुसार भाजयुमो,भाजप विद्यार्थी आघाडी व डिजिटल सायबर कॅफे यांनी पोलीस व भारतीय सेना भरती मध्ये जाणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना त्रास होऊ नये यासाठी टॉवर चौक खामगाव येथील भाजप कार्यालय येथे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये भाजप कार्यालयात ज्या पोलीस व सेनेत सेवा देण्याची इच्छा असलेल्या सर्वाना मोफत अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस ,राज्य राखीव दल, तसेच सेने मध्ये BSF, SSB, CISF, ITBP ,व आसाम रायफल्यस मधील भरती साठी अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे.अनेक इच्छुक तरुणांना ऑनलाइन अर्ज करण्यात अडचण येत आहे, हीच बाब भाजप जिल्हाध्यक्ष तथा युवा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे सूचनेनुसार भाजप कार्यालयात मोफत ऑनलाइन मोफत अर्ज भरण्याची सोय केली आहे, तरी सर्व पोलीस व भारतीय सेनेच्या सेवेत जाण्यासाठी असलेल्या गरजू उमेदवार यांनी भाजप कार्यालयात सकाळी ११ ते ५ या वेळेत येऊन मोफत ऑनलाइन अर्ज व इतर ऑनलाइन कामे करावी, काही अडचण असल्यास संपर्क करावा असे आवाहन भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा 9850368354, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड 9767923698, शहराध्यक्ष शुभम देशमुख 9096965570, आशिष सुरेका 8446661103, रोहन जयस्वाल 9822694440, गोलू आळशी 8805202136, पांडुरंग काळे स्वीय सहाय्यक आ. फुंडकर 7875226226 तसेच डिजिटल सेवाचे विशाल तायडे 8805581626 यांनी केले आहे.
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई विदर्भ शिक्षण शेगांव