एम.पी.एस.सी. परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणेबाबत विद्यार्थी आघाडीचे निवेदन
राज्य सरकार अजून किती स्वप्निलचे बळी घेणार – पवन गरड
खामगांव : काही दिवसांपूर्वी पुणे येथील स्वप्निल लोणकर या युवकाने आत्महत्या केली. हया युवकाने एमपीएससी परीक्षा पास करूनही अजून मुलाखत होत नाही आणि त्यामुळे नोकरी लागत नाही या सरकारी ढिसाळ कारभाराला कंटाळून सप्निल लोणकर या युवकाने आत्महत्या केली. राज्य सरकार अजून किती स्वप्निलचे बळी घेणार असा सवाल पवन गरड अध्यक्ष, भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी केला आहे. पुर्व परिक्षा, मुख्य परिक्षा, मुलाखत अश्या प्रकारे काठीण्याची उच्च पातळी पार करत एमपीएससी ची तयारी करीत असणारा प्रत्येक विद्यार्थी पुढे जात असतो, त्यानंतर त्याच्या पदरी यश प्राप्त होणार असत! परंतु जर सरकारच्या निष्काळजी धोरणामुळे वर्षामागून वर्ष लोटूनही परीक्षाच होणार नसतील, त्यांच्या मुलाखती रखडणार असतील तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याची होणारी राख रांगोळी याला जबाबदार कोण ? हा प्रश्न आज राज्यातले हजारो युवा विचारत आहेत आणि त्यामुळे स्वप्निल लोणकर याची ही आत्महत्या नसून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा नाहक बळी आहे !
आज महाराष्ट्रातील जवळपास ३००० युवकांची मुलाखत झालेली नाही, त्यामुळे ते एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊनही बेरोजगार आहे. या सरकारने २०१९ पासून या विद्यार्थ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. परंतु मेहनती शिवाय सत्तेत आलेल्या सरकारला या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची काय कदर असणार! भारतीय जनता युवा मोर्चा मागणी करीत आहे की,स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना किमान रु २५ लाख इतकी मदत देण्यात यावी आणि सदर प्रकरणी तातडीने ठोस निर्णय करावा अन्यथा, भारतीय जनता युवा मोर्चा प्रत्येक मंत्र्यांच्या ठीकठिकाणी गाड्या अडवून जाब विचारेल आणि न्याय मिळेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सोबत ठामपणे उभे राहून संघर्ष करीत राहील. एमपीएससी उत्तीर्ण युवकांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, विक्की हटटेल, नगेंद्र रोहणकार, यश आमले, विद्यार्थी आघाडीचे रुपेश खेकडे, आशिष सुरेका, कल्पेश बजाज,गोलु आळशी, श्रीकांत जोशी, हितेश पदमगीरवार, मनप्रित सिह,रोहन जैस्वाल, उपस्थित होते.