खामगांवात छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी 6 वा.जंगी स्वागत
खामगाव: ओबीसी आरक्षणासाठी लढाई लढणारे तसेच ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांची वीज कपात न करणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष अभ्यासू नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्षाची धुरा घेऊन विदर्भाचा सन्मान केला आहे. बुलढाणा जिल्हयात पहिल्यांदाच आगमन भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे येत आहेत. त्यांचे बुलढाणा जिल्हयात प्रथम आगमन प्रसंगी ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष् आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी दिली.विदर्भाला प्रदेशाध्यक्ष पद देऊन महत्त्वाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिली असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण अध्यक्ष या नात्याने समाज राजकारण क्षेत्रामध्ये कार्यरत राहू पक्षाचा विस्तार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने देश महाशक्तिशाली होण्यासाठी कार्यरत व्हावे यासाठी प्रयत्ऩ करावा. भाजपा मध्ये सर्व समाजाचे नागरिक , युवाशक्ती , मातृ शक्ती आहेत. पक्षाचा विस्तार होऊन सर्व समाजातील व्यक्तींना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. चंद्रशेखरजी बावनकुळेजींची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती हे त्याचेच एक उदाहरण आहे.प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर ते येणार असून अकोला येथून बुलढाणा येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार असून सदर बैठकीनंतर बुलढाणा येथून खामगांव येथे छत्रपति शिवाजी महाराज स्टेडीयम येथे छत्रपति शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शहरातून वाडी ता.खामगांव येथे सामाजिक भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.छत्रपति शिवाजी महाराज स्टेडीयम येथे सर्व भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी, सर्व आघाडी पदाधिकारी अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी सायंकाळी ठिक 6.00 वा आपल्या मोटरसायकल सह उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी खामगांव विधानसभा मतदार संघ तर्फे करण्यात आले आहे.