पुणे:भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष ओबीसी आघाडी व मा. आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष व स्मितसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ स्मिताताई गायकवाड यांच्या मार्फत महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गोंधळेनगर हडपसर येथे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, तुषार गायकवाड, अभिजीत बोराटे, आण्णा बांदल, निखिल शिंदे, डॉ. अशोक सोरगावी, रवींद्र चव्हाण,सागर पवार, सुधीर होले, सीमाताई शेंडे, सविताताई हिंगणे, संगीताताई पाटील, मीनाताई कादमाने, मनिषाताई राऊत, ज्योतीताई तोडकर, आशा भुमकर, शर्मिला डांगमाळी, पुष्पाताई नेवसे आदी मान्यवर, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी चांगला गुण दडलेला असतो त्या गुणाला शोधून त्याला वाव देऊन प्रोत्साहित करावे. मुले ही देशाची संपत्ती असून उद्याचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण व संस्कार घेऊन भविष्यात यश संपादन करून उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत असे सौ स्मिताताई तुषार गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गोंधळेनगर हडपसर येथील शाळेच्या अध्यक्षा शीलाताई साळुंके, उपाध्यक्ष कल्पना ताई जगताप, सचिव अरविंद जगताप, प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका उज्ज्वला ताई जगताप, माध्यमिक मुख्याध्यापक बारकुल सर यांचे सहकार्य लाभले.
previous post