January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शिक्षण

भाजपच्या वतीने महामानवाची जयंती उत्साहात

खामगाव : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशातील नागरिकांना एकसंघ बांधले त्यामुळेच आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश खंबीरपणे टिकून आहे असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे संयोजक सागर फुंडकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी खामगाव च्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते. भाजप कार्यालयात सर्वप्रथम सागरदादा फुंडकर व प स सभापती सौ रेखाताई मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचेही पूजन करून अभिवादन केले. यावेळी पुढे बोलताना सागर फुंडकर म्हणाले की समाजातील पीडित, गोरगरीब समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे यांचे विचार अंगीकारा असे आवाहन सगरदादा फुंडकर यांनी केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या असामान्य आदर्श व्यक्तिमत्त्वला सदैव स्मरणात ठेऊन त्यांचे प्रेरणेने सर्व समाजानी पुढे जाऊन आपली व देशाची प्रगती करावी असेही सागरदादा फुंडकर यांनी आवाहन केले . यावेळी यांचेसह भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, प स सदस्य राजेश तेलंग, नगरसेवक राजेंद्र धनोकार, संजय शर्मा, शेखर कुलकर्णी,सुनील वानखडे , विजय महाले, घाटपुरी उपसरपंच आकाश कुलट, सदस्य विशाल झनके, रमेश इंगळे, नाना धंदर, आशिष सुरेखा, युवराज मोरे, यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडक कमी कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबडेकरांमुळे देश एकसंघ- सागर फुंडकर

Related posts

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

nirbhid swarajya

उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

nirbhid swarajya

खामगांव मधे मानाच्या लाकडी गणपतीची साध्या पद्धतीत स्थापना

nirbhid swarajya
error: Content is protected !!