November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

भाजपच्या वतीने भारतरत्न अटलजींना अभिवादन करून सुशासनदिन साजरा

खामगाव : भाजपच्या वतीने भारताचे यशस्वी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. सर्वप्रथम सकाळी स्थानिक सामान्य रुग्णालयात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर,यांचे शुभहस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात कोरोना रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांचा सत्कार कऱण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे,डॉ गुलाब पवार, डॉ राहुल खंडारे, परिचारिका प्रमुख सौ सुमित्राताई राऊत, टेक्निशियन विठ्ठल पवार, सफाई कर्मचारी हरिषभाऊ सारसर, लेखापाल गणेश देशमुख, सहाय्यक अशोक पराते व रमेश अवचार या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसळ, व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागर फुंडकर यांनी भाजप कार्यालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी दुपारी 12 वा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधनाचा शेतकाऱ्यांसोबत लाभ भाजप कार्यालयात घेतला.

यावेळी त्यांच्यासह नगराध्यक्ष सौ.अनिताताई डवरे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, ओमसेठ खंडेलवाल, माजी न प उपाध्यक्ष महेंद्र रोहणकार, किशोरभाऊ गरड, सत्यनारायण थानवी, डॉ एकनाथ पाटील, न प आरोग्य सभापती तथा गटनेते राजेंद्र धनोकार, नगरसेवक सतीशअप्पा दुडे, गणेश सोनोने, संजय मोहिते, गणेश जाधव, नरेंद्र शिंगोटे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा,भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, शहर युवती प्रमुख सी ए सौ स्नेहा चौधरी, वैभव डवरे, जितेंद्र पुरोहित,अमोल सिरसाट, अशोक हत्तेळ, नागेंद्र रोहनकार, गोलू आमले, विक्की हत्तेळ, हितेश पदमगिरवार, प्रसाद एदलाबादकर, गोलू आळशी, विक्की चौधरी, विक्की रेठेकर, माणप्रित चौहान,श्रीकांत जोशी, हरीश सारसर, सचिन पाठक, कल्पेश बजाज, पवन तनपुरे, पवन राठोड, नितीन पोकळे, आशिष सुरेखा, रवी गायगोळ, रोहन जैस्वाल, मोहित ठाकूर, गौरव माने, चंदू भाटिया, अमित बेरोजा, कृनाल बहुनिया, रवी चौस्वर, भावेंद्र दुबे, हृषीकेश कावणे, विशाल वाकोडे, आशिष बघेल, शुभम डवले, मयूर कोठळकर, अभिषेक रत्नबारके,मंथन हिवरखेडे,रोशन गायकवाड, आकाश भडासे, यांचेसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related posts

बुलडाणा ऐवजी बुलढाणा असे लिहावे लागेल

nirbhid swarajya

दीड वर्ष चाललेली कर्जमाफी दोनच महिन्यात पूर्ण करणार – अजित पवार

nirbhid swarajya

संतांची मांदियाळी : विनायक महाराज शांती आश्रम ला आले यात्रेचे स्वरुप

nirbhid swarajya
error: Content is protected !!