‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची घोषणाबाजी
खामगांव : महाराष्ट्रातील देवस्थाने व धार्मिक स्थळे खुले करण्यासाठी भाजपाच्या वतीने आज येथील राम मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या काळात जीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास व मदिरा सर्व काही खुले केले आहेत, मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे बंद ठेवलेली आहे. सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे तात्काळ खुली करावी यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तसेच आ.अॅड.आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत केला नगर मधील राम मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र,भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे. केंद्र सरकारने ४ जून २०२० रोजी परिपत्रक झाली जारी केले आहे. त्यानुसार,देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू केलेली आहे. राज्यात सामाजिक अंतर राखून व आवश्यक त्या नियम व अटी शर्ती सह देवस्थाने व धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी भाविक भक्तांकडून मागणी होत आहे. मात्र ठाकरे सरकार या मागणीकडे लक्ष देत नसल्याचे आ.अॅड.आकाश फुंडकर यांनी सांगितले. सरकारने जर १ तारखेच्या आत धार्मिक स्थळे व मंदिरे खुली केली नाहीत तर भाजपाच्या कडून यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही आ.अॅड.आकाश फुंडकर यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले.या आंदोलनात भाजपचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
