खामगांव : येथील नांदुरा रोडवर असलेल्या हॉटेल गौरव समोर भरधाव दुचाकीची विद्युत पोलला जोरदार धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना आज संध्याकाळी ५:३० च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या महितीनुसार येथील आडीबीआय बँकेमध्ये प्रोव्हिजन ऑफिसर या पदावर असलेले रोनित मुशीयारी वय २६ रा.आसाम ह. मु. देशमुख प्लॉट हा आपल्या दुचाकी क्र. एमएच -१२-एस एस-१६२१ ने नांदुरा कडे जात असताना भरधाव वेगाने असलेली दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या इलेक्ट्रिक पोल वर जाऊन आदळली. सदर अपघात इतका जोरदार होता कि, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते व घटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला होता. सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. रोनित त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. रोनीतच्या मृत्युची बातमी कळताच आयडीबीआय बँकेतील मॅनेजर व कर्मचारी रुग्णालयात जमा झाले होते.
previous post