मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या पोलीस कर्मचारी गीता तायडे यांचा जागीच मृत्यू
बुलडाणा : मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या 45 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने चिरडल्याने या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे , ही घटना आज सकाळी चिखली रोड वरील MSEB कार्यालयासमोर घडली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी गीता तायडे ह्या आपल्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी सहा वाजता च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असता, हिमाचल वरून सफरचंद घेऊन नांदेड कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिखली रोड वरील MSEB कार्यालयासमोर या महिलेला जबर धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ट्रक चालक बाबुसिंग प्रेमसिंग अहिरे व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे, महिलेच्या अपघाती मृत्यूने पोलीस विभागामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे…