खामगाव: तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनतंर्गत येत असलेल्या भंडारी येथील मुलगी विक्री प्रकरणाला गुरूवारी वेगळेच वळण मिळाले. आपसी वादातून झालेल्या भांडणातील कारवाईतून सुटका मिळविण्यासाठी मुलगी विक्रीचा बनाव रचण्यात आल्याचे दिवसभरातील घडामोडींवरून समोर येत आहे. दरम्यान, पिंपळगाव राजा पोलिसांनी याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाविरोधातील पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रकारामुळे पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी पिंपळगाव राजा येथे तळ ठोकून होते.भंडारी येथील लक्ष्मीबाई हरचंद धांदु यांनी २७ सप्टेंबर रोजी पिंपळगाव राजा पोलिसांत जुन्या वादातून जितेंद्रगीर पर्वतगीर मुळे, उज्वला जितेंद्रगीर मुळे यांनी लक्ष्मीबाई आणि तिच्या अंकलेश नामक मुलास मारहाण केली.तर २९ सप्टेंबर रोजी हिरकलाबाई राजुगिर चव्हाण जखमी अवस्थेत परस्पर विरोधी तक्रार देण्यासाठी आल्या. दरम्यान, जखमी असल्याने हिरकलाबाई चव्हाण यांच्यावर पिंपळगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. याप्रकरणी हिरकला चव्हाण यांच्या तक्रारीवरून हिराबाई परवत मुळे, उज्वला जितेंद्र मुळे, जितेंद्र परवत मुळे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर हिराबाई मुळे यांच्या दुसºया एका तक्रारीवरून सागर गिर, अंकलेश गीर यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणामुळे गुरूवारी पोलीस प्रशासनात एकच धावपळ उडाली. दरम्यान, एसडीपीओ अमोल कोळी दिवसभर पिंपळगावराजा पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. भंडारी येथील अतिशय गुंतागुतीच्या या प्रकरणात अनेकांची कोंडी झाली. आपसी वादातून कंडारी परिसराचे नाव बदनाम होत असल्याने गावातील एक शिष्टमंडळ पोलिस स्टेशनला गुरूवारी सायंकाळी धडकले होते. या शिष्टमंडळाचे म्हणणेही पोलिसांनी ऐकुण घेतले. जिल्हा पोलीस अधिक्षक घाटावरील विस्कटलेली घडी सावरण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे त्यांचे घाटाखाली कमालिचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे घाटाखाली अवैध धंद्यासोबतच गुन्हेगारी वाढीस लागली आहे. संवेदनशील असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा पोलिस अधिक्षकांची पकड सैल होत असतानाच, खामगाव येथे अपर पोलिस अधिक्षकांचा पत्ताच नाही. अपर पोलीस अधिक्षक हजर का होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून, एएसपीच्या चुकीच्या आँर्डर बाबत प्रशासनाकडून कोणताही खुलासा होत नसल्याचे सामान्य बुचकळ्यात पडलेत. श्रवण दत्त अवैध व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याने, राजकीय दबावातून त्यांचा रस्ता अडविण्यात आल्याची जोरदार चर्चा पोलिस वर्तुळात होत आहे. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनतंर्गत भंडारी येथील अल्पवयीन मुलगी विक्री प्रकरणाला दोन गटातील आपसी वादाची किनार आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलगी विक्री करण्याचा कोणताही प्रकार पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला नाही.सतीश आडे ठाणेदार, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.
next post