April 19, 2025
जिल्हा

भंगाराच्या दुकानाला भीषण आग


चिखली : चिखली शहरातील मध्यवस्तीत, आठवडी बाजार स्थित असलेल्या मच्छी बाजारातील भंगाराच्या दुकानांमध्ये आज  १४ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  याबाबत असे की, कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन करण्यात आले आहे, तर चिखली शहरात मुख्याधिकारी यांचे आदेशानुसार मेडिकल व दवाखाने वगळून संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने आज पासून तीन दिवस संपुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार आज संपूर्ण दुकाने बंद होती मात्र दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील आठवडी बाजारातील काही भंगाराच्या दुकानांना अचानक आग लागली, सर्वत्र सामसूम असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले, आगीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, नगर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले त्या नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तर प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी शे समदखा यांची भंगार दुकान व नजीर कुरेशी यांचे भंगाराचे गोडाऊन असल्याचे समजते. घटनेची माहिती प्राप्त होताच चिखली नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी मोक्यावर पोहचून आगीवर वेळेवरच नियंत्रण मिळवले. उशीर झाला असता तर बाजारातील असंख्य दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली असती.यावेळी मोठ्या संख्येने पोलिस व न.प. मुख्याधिकारी अभिजित वायकोस समेत कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र अवैध

nirbhid swarajya

तर मिरवणुका, आंदोलने, सभा ‘या’ कारणामुळे रद्द होणार

nirbhid swarajya

ती बेकायदेशीर हर्राशी पुढे ढकलण्यात आली….

nirbhid swarajya
error: Content is protected !!