खामगांव : येथील डीपी रोडवरील राघव संकुल मध्ये ब्लॅक कॅफे कॉफी शॉप चे उदघाटन रेणुका फाऊंडेशन चे अध्यक्ष गजानन लोखंडकार यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये सध्या अनेक युवक बेरोजगार झाले आहेत मात्र या बेरोजगारीला कंटाळून न जाता खामगाव मधील काही युवकाने डीपी रोडवरील राघव संकुल मध्ये “ब्लॅक कॅफे” कॉफी शॉप सुरू केले आहे या कॅफेमध्ये ग्राहकांना हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, चहा, बर्गर, पिझ्झा,चायनीज यांसह अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाची परिस्थिती पाहता या कॅफे मध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने दिलेल्या नियम व अटी चे पालन करुन टेबल व खुर्च्या लावण्यात आले आहेत. तसेच येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये युवक व युवतींना आपल्या मित्र-मैत्रिणींचा बर्थडे सुद्धा साजरा करता येणार आहे. यासाठी या कॅफेमध्ये 20 ते 25 लोकांची बसण्याची एक खास व्यवस्था सुद्धा येथे केलेली आहे.ग्राहकांनी एक वेळ भेट देऊन आम्हाला सेवेची संधी द्यावी असे या कॅफेचे संचालक अमर देशमुख यांनी सांगितले आहे. यावेळी कॅफे चे संचालक अमर देशमुख यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तथा मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.