खामगाव : तालुक्यातील शेलोडी येथे ब्रिस्टॉल न दिल्याच्या करणावरुन किराणा गोडावुनला आग लाऊन २ लाख ५० हजारचे नुकसान केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. शेलोडी येथील बस स्थानकावर चंद्रकला सुनील इंगळे यांची किराणा दुकान आहे. सौ चंद्रकला इंगळे ह्या २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजता च्या सुमारास ते दुकान बंद करत असताना गावातीलच सागर राऊत हा दुकानावर आला व इंगळे यांना ब्रिस्टॉल मागत होता,परंतु चंद्रकला इंगळे यांनी ब्रिस्टॉल नाही आहे असे सांगितले. सागर राऊत याने रागात म्हटले की’आम्ही पैसे देत नाही का’ असे बोलून वाद घातला. त्यानंतर चंद्रकला इंगळे व त्यांचा मुलगा महेंद्र इंगळे असे दोघांनी सदर दुकान बंद करून घरी गेले होते. तर ब्रिस्टल न दिल्याच्या कारणावरून नमूद आरोपी सागर राऊत याने चंद्रकला सुनील इंगळे यांच्या किराणा सामानाचे गोडाऊनला आग लावून २ फ्रीज व किराणा सामानएकूण अंदाजे २लाख ५० हजार रूपयांचे नुकसान केले.सौ चंद्रकला इंगळे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी सागर राऊत यांचे विरुद्ध भादवि कलम 435 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ देवराव धांडे करीत आहेत.
previous post