January 1, 2025
बुलडाणा

बोलेरो जिपचे टायर फुटल्याने जिप पलटी एक ठार तिन गंभीर..

लोणार तालुक्यातील  किन्ही गावाजवळ असलेल्या वळणावर बोलेरो जिपचे टायर फुटले व जिपवरील चालकाचा ताबा न राहील्याने जिप समोरून येणाऱ्या आयशरला धडकल्याने जिप पलटी झाली यामध्ये एक महीला ठार तर तिन जन गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान घडली याबाबत लोणार पोलीसानी बुलेरो चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील 9 जण औरगांबाद येथे रूग्नालयात भरती असलेल्या नातेवाईकाना भेटण्यासाठी सकाळी 7.30 वाजता आसेगावरून बोलेरो जिप क्रं. एम एच 37 एस 7211 ने जात असताना लोणार ते किनगाव जटटु रोडवर किेन्ही गावाजवळ जिपचे मागील टायर फुटल्याने जिपवरील चालकाचा ताबा राहीला नाही त्यामुळे सदर जिप किनगावजटु कडुन येणाऱ्या आयसर क्रं.एम एच 28ए बी 7082 वर डिझेल टाकीवर आदळल्याने जिप पलटी झाली यामध्ये शंकुतला पांडुरंग शिंदे वय 55 रा. पागरखेडा ता. रिसोड जि. वाशिम ही महीला जागीच ठार झाली असुन यामध्ये संगीता संतोष इंगोले, बडु पिराजी खानझोडे  पुरनाबाई श्रीराम शिंदे हया गंभीर जखमी झाल्या असुन जखमीना ग्रामीण रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत लोणार पोलीसात बडु पिराजी खानझोडे यांनी  बोलेरो चालक गोपाल मंगल वानखेडे याच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे या घटनेची माहीती पोलीसाना मिळताच पोलीस उपनिरीक्षक उंकडराव राठोड, राम गिते घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास लोणार पोलीस करीत आहे..

Related posts

वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ…

nirbhid swarajya

दोन देशी बनावटीचे पिस्टल जप्त. चारआरोपी अटकेत,लाखोचा मुद्देमाल जप्त….

nirbhid swarajya

जिल्ह्या शल्य चिकित्सक डॉ. पंडित सक्तीच्या रजेवर

nirbhid swarajya
error: Content is protected !!