प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद ; रक्तदान करण्यासाठी महिलांचा पुढाकार
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरीआडगाव येथील स्वर्गीय भैयाभाऊ पाटील विद्यालय मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील ४० महिला व पुरुषांनी सहभाग घेतला जगभरामध्ये कोरोना विषाणूने कहर केला असून दिवसेंदिवस त्याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे.
महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बोरीअडगाव येथे शिवाजीराव पाटील व ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या वेळी ४० जणांनी रक्त दान केले अशी माहिती स्वर्गीय भैयाभाऊ पाटील विद्यालय संचालक रावसाहेब पाटील यांनी दिली आहे.