खामगाव:-बोरी अडगाव ग्राम सेवा सहकारी संस्थेची २६ जून रोजी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य रावसाहेब पाटील व सहकार सोसायटी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवा सोसायटी मध्ये १३ पैकी १३ जागांवर विजयश्री मिळवला सर्वसाधारण मतदारसंघातून संजय शिवाजीराव पाटील, संतोष जनार्दन टिकार , सारंगधर श्रीराम टिकार, सुरेश ज्ञानदेव बोहरपी, विजय लक्ष्मण तायडे, योगेश रमेश राऊत, रमेश रामकृष्ण सुरवाडे, साहेबराव भोनाजी सुरवाडे, भटक्या विमुक्त जाती मधून शांताबाई भास्कर खराटे, अनुसूचित जाती मतदार संघातून नानाभाऊ तुकाराम सुरवाडे, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून सुरेंद्र दिनकर टिकार,महिला राखीव मतदारसंघातून आशाबाई ओंकार करंगाळे, मंगला भगवान टीकार, निवडून आले या निवडणुकीत ४२७ मतदारांपैकी ३६२ हक्क बजावला मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला गेल्या कित्येक वर्षांपासून ही निवडणूक अविरोध पार पडत असे परंतु अनैसर्गिक युतीमुळे या निवडणुकी मध्ये रंगत पाहायला मिळाली