November 21, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेगांव सामाजिक

बोरी अडगांव येथे उद्या श्री अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळ्याची सांगता…

सिहोर येथून प्रदीपजी मिश्रा यांनी सिद्ध केलेले १२१००० रुद्राक्षाचे होणार वाटप

खामगाव : पवित्र श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बोरी अडगाव येथील श्री मनकामनेश्वर महादेव मंदिर येथे एक महिनाभर अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळा उज्जैन येथील ब्राह्मणाच्या हस्ते पार पडत असून या सोहळ्याची सांगता उद्या दिनांक १६ सप्टेंबर रोजी होणार आहे शिवलिंग महाअभिषेक सोहळ्यात एक महिनाभर दररोज ११ जोडप्याच्या हातून श्री मनकामनेश्वर महादेव मंदिरात मंत्रोच्चाराच्या घोषात एक लाख ११ हजार १११ मातीचे लिंग तयार करून त्याची पूजा अर्चा करून महाआरती झाल्यानंतर दररोज एक लाख ११ हजार एकशे अकरा मातीच्या लिंगाचे विसर्जन केल्या जात होते. दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झालेल्या महाअभिषेक सोहळ्याची सांगता ही उद्या दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असून सांगता सोहळ्या दरम्यान शिव महाराज वामन पाटील ह. मु. इंदूर यांच्या वतीने प्रसिद्ध शिव कथाकार श्री प्रदीपजी मिश्रा सीहोर यांनी सिद्ध केलेले एक लाख एकवीस हजार रुद्राक्ष वाटपही करण्यात येणार आहे उद्या सकाळी ४ वाजता भस्माआरती होणार आहे त्यानंतर सकाळी ५ ते १० या वेळात होम हवन महाअभिषेक आदी कार्यक्रम होणार असून सकाळी ११ वाजता पासून महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे सदर अखंड शिवलिंग महाभिषेक सोहळ्याचे आयोजन शिव महाराज वामन पाटील ह. मु. इंदूर यांनी केले असून त्यांना बोरी अडगाव आणि परिसरातील गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे उद्या बोरी अडगाव येथे हजारो भाविकभक्त या सोहळ्याला उपस्थित राहणार असून पवित्र श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या सोहळ्या दरम्यान देखील हजारो भाविकांनी उपस्थिती लावून हा सोहळा बघितला दररोज दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी होत होती दरम्यान मंदिरावर सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती श्री मनकामनेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन असून हजारो भाविकांची श्रद्धा या मंदिरावर आहे जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून श्री शिव महाराज पाटील हे सध्या इंदूर येथे वास्तव्यास असून मोठे उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत परंतु आपल्या मातृभूमीतील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी ते दरवर्षी येतात आणि हा सोहळा आयोजित करतात त्यांच्या परिश्रमाने आणि मार्गदर्शनाखाली या वर्षी देखील हा सोहळा उत्साहात संपन्न होत असून या सोहळ्याच्या समारोपप्रसंगी अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती राहणार आहे परिसरातील गावकऱ्यांनी देखील या सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिव महाराज वामन पाटील व गावकरी यांनी केले आहे.

Related posts

तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीची उत्सुकता ; सदस्यांना लागले आरक्षण सोडतीचे वेध…!

nirbhid swarajya

डॉ नितीश अग्रवाल आता प्रत्येक शनिवारी आयकॉन होस्पिटल अकोला येथे सेवा देणार

nirbhid swarajya

ओटीपी देणे पडले महागात

nirbhid swarajya
error: Content is protected !!