खामगाव:तालुक्यातील बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर तोमर यांची तर उपाध्यक्षपदी रामधन बिचारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील महाराणा प्रताप सभागृहात ग्रामसेवा सहकारी संस्थेची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३ जुन रोजी पार पडली. यामध्ये संचालक मंडळातून अध्यक्ष पदासाठी मधुकर तोमर तर उपाध्यक्ष पदासाठी रामधन विचारे यांचे प्रत्येकी एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी ,सुरेशसिंग तोमर, जीवनसिंग तोमर,प्रेमसिंग तोमर, रमेश वानखडे, गजानन जामोदकर, दलपत हेलोडे, छायाबाई विलास तोमर, रामभाऊ कवळे, रेणुकाबाई विष्णू ढोले, प्रभाकर मोरे आदी संचालक उपस्थित होते. निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून विजय ठाकरे, सहाय्यक सुभाष सपाटे, सचिव रवी उन्हाळे यांचे सहकार्य लाभले.
next post