खामगाव: तालुक्यातील बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक १४ मार्च रोजी पार पडली. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलने वर्चस्व राखीत १३ पैकी १३ उमेदवार निवडून आले आहेत.यामध्ये सर्वसाधारण कर्जदार खातेदार मतदारसंघांतून मधुकर तोमर, सुरेशसिंह तोमर, दिवानसिंग तोमर, जीवनसिंग तोमर, प्रेमसिंग तोमर, रमेश वानखडे, रामदास बिचारे व गजानन जामोदकर तर अनुसूचित जाती जमाती कर्जदार खातेदार मतदारसंघातून दलपत हेलोडे, महिला राखीव मतदारसंघांतून रेणुकाबाई विष्णू ढोले व छायाबाई विलास तोमर, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्गीय प्रवर्ग मतदारसंघातून रामभाऊ कवळे तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रभाकर मुर्हे निवडून आल्या आहेत
,ग्रामसेवा सहकारी संस्थेची निवडणूक जिल्हा परिषद केंद्रीय मराठी पूर्व माध्यमिक शाळेत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडली या निवडणुकीत एकूण १७५ मतदारांपैकी १४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय ठाकरे तर केंद्राध्यक्ष एस. पी. हिवरखेडे तसेच मतदान अधिकारी श्रीकांत ठाकरे, एम. एस. चार्मोसीकर, रमेश सातव, सुभाष सपाटे व प्रवीण देशमुख यांनी निवडणुकीची जबाबदारी पार पाडली.