शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
खामगाव :- तालुक्यातील बोरजवळा येथील शेतात बिबट्याने एका वासराची शिकार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.निलेश मधुकर मुऱ्हे हे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास गेले असता त्यांना मक्यामध्ये बिबट्या दिसला.सुरूवातीला ते घाबरले परंतू त्यांनी आजुबाजुला पाहिले असता त्यांना वासराची शिकार झालेली दिसली.सुरुवातीला ते घाबरले परंतू लगेच सावरून त्यांनी ही माहिती गावचे सरपंच सौ. शितल दादाराव वानखडे यांना दिली. सरपंचानी तात्काळ ही माहिती वन विभागात तसेच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा यांना कळवली असता वन विभागाचे अधिकारी पडोळ व पि. राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश आडे हे घटनास्थळी येऊन बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या मुऱ्हे यांच्या शेतात आढळून आला परंतु वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करता आले नाही. तेथून तो मुकुंदा कोगले यांचा शेताकडे निघून गेला ,अशी माहिती मिळाली आहे. तरी घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाचे अधिकारी व पोलिस यंत्रणेने केले आहे.