November 20, 2025
नांदुरा

बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनी तसेच विक्रेत्यांचे परवाने रद्द करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी – संभाजी ब्रिगेड

नांदुरा : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच चिंतेत असतो. अशातच पिकाला योग्य भाव मिळत नाही. या दुधारी संकटामुळे शेतकरी नेहमीच चिंतेत असतो, अशातच बोगस बियाणे मिळणे हे म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक. जूनच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली व हवामान खात्यावर विश्वास ठेवून शेतकरी राज्याने पेरणी उरकली परंतु पेरलेले सोयाबिन हे उगवलेच नाही यामुळे शेतकऱ्यांचा पेरणी खर्च व मेहनत पाण्यात गेली त्याला पूर्णता जबाबदार म्हणजे बोगस बियाणे वितरण करणारी कंपनी व दुकानदार यामुळे जिल्ह्यातील मुख्य:ता नांदुरा तालुक्यातील दुबार पेरणी होऊन तिसऱ्यांदा पेरणी करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे

याकरिता आपण संबंधित दोषींवर म्हणजे शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणार्‍यांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करून शेतकऱ्यांना विश्वास द्यावा की आपण सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तसेच योग्य तो मोबदला देऊन शेतकऱ्यांना या संकटसमयी मदत करावी या आशयाचे निवेदन आज दिनांक 29 जून 2020 रोजी नांदुरा तालुका कृषी कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषिमंत्री यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री मंगेश सोळंके, नांदुरा तालुका अध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील, विठ्ठल भगत, पवन सोळंके, प्रफुल्ल बिचारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

विद्यार्थिनीने मिळवले १०० पैकी १०० गुण

nirbhid swarajya

देशमुख परिवारात आगळीवेगळी आदर्श शिवजयंती साजरी

nirbhid swarajya

किराणा दुकान फोडून मुद्देमाल लंपास

nirbhid swarajya
error: Content is protected !!