April 4, 2025
अमरावती आरोग्य क्रीडा खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा लोणार विदर्भ विविध लेख व्यापारी शिक्षण शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा

बुलढाण्याच्या महामोर्चात “जरांगे पाटलांचे कुटुंबीय” सहभागी होणार?

बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण छेडले आहे. त्यांचे उपोषणाने राज्य सरकारची झोप उडाली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरांगे पाटील हे नाव घुमत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बुलढाणा येथील क्रांती मोर्चात बोलवण्यासाठी समन्वयकांनी प्रयत्न सुरू केले असून राज्याचे आकर्षण असलेले हे कुटुंब बुलढाण्याच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्यास या मोर्चाची उंची अर्थातच वाढणार आहे.प्राप्त माहितीनुसार जरांगे पाटील यांची मुलगी मोर्चात संबोधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मनोज जरांगे पाटील हे नाव आज राज्यापासून केंद्रा पर्यंत परिचित झाले आहे. जालना जिल्ह्यातील ह्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई छेडली आहे. त्यांचे उपोषण दडपण्यासाठी पोलिसांनी जालना येथे लाठी हल्ला केला. यामध्ये अनेक स्त्री-पुरुष जखमी झाले. अमानुषपणे झालेल्या हल्यामुळे महाराष्ट्रामध्ये असंतोष धुमसत आहे. आरक्षणाची मागणी व या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा येथे मराठा क्रांती मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.

Related posts

आज प्राप्त 19 कोरोना अहवाल निगेटिव्ह

nirbhid swarajya

नीट,जेईई परिक्षा पुढे ढकलण्यात यावी याकरिता काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

nirbhid swarajya

अजय तीतरे यांच्या प्रसंगावधानतेने वाचले हरणाच्या लहाण पाडसाचे प्राण…

nirbhid swarajya
error: Content is protected !!