बुलढाणा : येथील मध्ये कार्यरत असलेले एका हेडकॉन्स्टेबल चा कोरोना संसर्गामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढतच चालला आहे. यामध्ये पोलिस विभागाला ही या विषाणूने घेरले असून कोरणा संसर्गामुळे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोहेकॉ गजानन तायडे या कर्मचाऱ्यांचा आज सकाळी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. पोहेकॉ गजानन तायडे यांना 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांना अगोदर सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी आठ वाजता च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.बुलढाणा पोलीस दलातील कर्मचार्यांच्या कोरोनामुळे हा पहिला बळी गेला आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दिले आहे.
previous post