बुलढाणा:झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत बँक लुटून लुटलेल्या पैश्यातुन एक ऑफिस तयार करून एक कार विकत घेवून त्या कारमध्ये बुलढान्यातील श्रीमंत असलेले बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व मलकापूर विधानसभेचे भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा बुलडाणा शहरात राहणारे तिघांचे प्लॅन होते.असा खळबळ जनक माहिती दिल्लीत आयबी ने अटक केलेल्या आरोपींकडून समोर आली आहे. मिर्झा आवेज बेग (२१) शेख साकीब शेख अन्वर (२०) उबेद खान शेर खान (२०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.हे सर्व ते बुलडाणा शहरातील शेर-ए-अली चौकातील राहणारे आहेत. तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते.सध्या या तिघा आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात असून या तिघांनी अकोला एटीएस कडून चौकशी करण्यात येत आहे.बेरोजगारीला कंटाळून बुलडाणा शहरातील शेर-ए-अली चौकातील राहणारे मिर्झा आवेज बेग (२१) शेख साकीब शेख अन्वर (२०) उबेद खान शेर खान (२०) हे तिघेही काही दिवसांपूर्वी अजमेर येथे गेले होते.त्याठिकाणी तिघांपैकी एकाने 2500 शे रुपयांची नकली एअर गन विकत घेतली.व बँक लुटून लुटलेल्या पैश्यातुन एक ऑफिस तयार करून एक कार विकत घेवून त्या कारमध्ये बुलढान्यातील श्रीमंत असलेले बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व मलकापूर विधानसभेचे भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा प्लॅन आखला होता.मात्र याची भनक दिल्ली आयबीला लागल्याने या तिघा आरोपींना ताब्यात तिघांना प्रथम बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व त्यानंतर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात असून या तिघांनी अकोला एटीएस कडून चौकशी करण्यात येत आहे. अशी माहिती प्रल्हाद काटकर,निरीक्षक पोलीस निरीक्षक,बुलढाणा यांनी दिली आहे