April 11, 2025
खामगाव बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

बुलढाणा जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित…

दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान,आचार संहिता लागू राहणार.

बुलडाणा: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ८ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कालावधीत आचार संहिता लागू राहणार आहे.घोषित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.तहसिलदार यांनी दि.१८ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्दी करावयाची आहे. दि.२४ ऑगस्ट २०२२ ते दि.१ सप्टेंबर २०२२ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळून नामनिर्देशन पत्रे मागविणे आणि सादर करता येतील. नामनिर्देशन पत्र छाननी दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत करण्यात येतील.दि.०६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. याचे दिवशी निवडणूक चिन्ह नेमून तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दुपारी ३ नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.आवश्यक असल्यास दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दिनांक २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी कळविले आहे.

Related posts

सुप्रसिद्ध ‘एमडीएच’ मसालेचे संस्थापक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

nirbhid swarajya

वंचितच्या जिल्ह्याध्यक्ष पदी गणेश चौकसे यांची निवड

nirbhid swarajya

सर्जा-राजाचा सण ‘बैलपोळा’…लासुरा बु येथील जवंजाळ परीवाराचा पोळा ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात

nirbhid swarajya
error: Content is protected !!