बुधवारी दिवाळी साजरी होणारच – जय श्रीराम
जळगाव जा. : आज अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा. या ठिकाणी भूमिपूजन केलं जाणार आहे. दरम्यान या ऐतिहासिक शुभारंभप्रसंगी संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान मंगळवार ४ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यात राममंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभुमिवर सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली असून श्रीराम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार कलम 37 अन्वये अधिसूचना व कलम 37 अन्वये आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान जिलह्यातील जळगाव जामोद मतदार संघाचे माजी मंत्री आ.डॉ. संजय कुटे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंट वर पोस्ट टाकत बुधवारी दिवाळी साजरी करणार म्हणजे करणार अशी पोस्ट केली आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमधे ” बुलढाणा जिल्हा प्रशानाचा निषेध, उद्या दिवाळी साजरी होणारच – जय श्री राम असे लीहले आहे. राममंदिर भूमिपूजन हा ऐतिहासीक सोहळा असून आमदार कुटे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे.