बुलडाणा : तालुक्यातील चिखला घाटामध्ये एका अनोळखी इसमाचा अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा तालुक्यातील चिखला घाटामध्ये काही नागरिकांना एका इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी पोलिसांना इसमाचे मनगट तोडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला मारहाण करून त्याची हत्या केली व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आल्याचे पोलिसांना लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध कलम 302, 201 आयपीसी नुसार गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर इसमाच्या कपड्यावर त्याची ओळख पटविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. सदर इसमाची ओळख पटविण्याचे आव्हानही पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
next post