बुलडाणा : राधेश्याम चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली बुलढाणा अर्बन पतसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांचे ,सभासदांचे हित जोपासात अनेक वर्षापासून उत्तम दर्जाची बँकिंग सेवा देत आहे. सोबतच सामाजिक बांधिलकी जपत सर्व जाती-धर्माच्या उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये सामाजिक एक ठेव अधिक बळकट व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सहकार विद्या मंदिर विद्या नगरी बुलढाणा येथे बुद्ध वंदना घेण्यात आली. सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून उपस्थित भिक्शु संघ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संपूर्ण जगात बुद्धांची करुणासागर अशी ओळख आहे. बुद्धांची करूणा त्यांनी विश्वाला दिलेले योगदान आहे. कुठलेही शस्त्र हातात न घेता विश्वात ज्ञान, शांती, अहिंसा या मूल्यांचे मानवी जीवनातील महत्त्व भगवान बुद्धांनी पटवून दिले आहे. म्हणूनच बुद्ध ही व्यक्ती नसून एक विचारधारा आहे व जो पर्यंत विज्ञान क्षेत्रात तर प्रगती करेल तसा धम्ममार्ग प्रकाश होईल असे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी आपल्या मनोगतामध्ये तथागत गौतम बुद्ध यांचे वैज्ञानिक विचार कथा दया-क्षमा-शांती, सम्यक वाणी, संमेक मार्ग,समता तथा ममतेची विचार विद्यार्थ्यांना मिळावे व त्यांचे भावी आयुष्य मंगलमय व सुखकर व्हावे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला अमोल हिरोळे, डॉ.योगेश गोडे, अँड.राजेश लहाने, सचिन वैद्य,जयंतराव सोनवणे, अनंता देशपांडे, संजय गव्हाणकर तथा बुलढाणा अर्बन पतसंस्था यांचे कर्मचारी आणि सहकार विद्या मंदिर येथील कर्मचारी या कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित होते.