बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा अर्बन परिवाराकडून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गोवर्धन ईमारतीच्या सभागृहात अर्धवशिर्ष पठण करण्यात आले. बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदा २२ वे वर्ष आहे. दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गणेश उत्सवानिमित्त संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर केलेली आहे. दरम्यान दि.१९ सप्टेंबर रोजी बुलडाणा अर्बनच्या आवारात अक्षरधाम प्रतिकृतीचा उत्कृष्ट देखावा मंडळाच्या वतीने उभारण्यात आला. यावेळी बुलडाणा अर्बन चे अध्यक्ष श्री राधेशाम चांडक उपाख्य भाईजी तथा बुलडाणा अर्बन संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख तथा कर्मचारी उपस्थितीत होते. दरम्यान दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी अर्थवशिष पठण मोठ्या भावभक्तिने आयोजन करण्यात जाते. दुपारी इयत्ता ५-७ या विद्यार्थीसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित उत्साहात पार पडली. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री अभय पावडे सचिव संजय राजगुरे व गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
अकोला अमरावती आरोग्य क्रीडा खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा विदर्भ विविध लेख व्यापारी शिक्षण शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा सोलापुर