संपर्कातील 50 नागरिकांना क्वारंटाईन करून 24 लोकांचे घेतले नमुने
बुलडाणा : बुलडाण्यातील मृतक रुग्णाचा कोरोना पॉझेटीव्ह अहवाल आल्याने जिल्हा प्रशासनाने महत्व उपाय करण्यासाठी सुरुवात केली आहे. बुलडाणा शहर पूर्णपणे लॉकडाऊन केले असून ज्या परिसरात कोरोना पॉझेटीव्ह रुग्ण राहत होता त्या परिसरात रेड अलर्ट करण्यात आले असून या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावून कोणाला ही घराबाहेर पडण्याबाबत बंदी घातली आहे.तर कोरोना पॉझेटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 50 लोकांना क्वारंटाईन करून या मध्ये हायरिक्स आणि लो रिक्स ग्रुप तयार करून हायरिक्स ग्रुपमधील 24 नागरिकांचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त बुलडाणा नगर परिषदेच्या साहाय्याने 40 आरोग्याचे पथक स्थापन करून रेड अलर्ट करण्यात आलेल्या परिसरातील परिवाराची चौकशी करीत आहे तर नगर परिषदेच्या वतीने परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.विशेष म्हणजे कोरोना पॉझेटीव्ह रुग्ण ज्या खाजगी रुग्णालय आणि आस पासचा परिसरही रेड झोन मध्ये घेतले आहे.शनिवारी एका 45 वर्षीय रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्ष आयसोलेशन कक्षात सकाळी मृत्यू झाला होता.त्यानंतर रविवारी नागपूरहून त्या रुग्णाचा कोरोना पॉझेटीव्ह म्हणून अहवाल आला आणि जिल्हा प्रशासन सतर्क होवून महत्वाचे निर्णय घेत संपूर्ण बुलडाणा शहराला लॉकडाऊन करून कोरोना पॉझेटीव्ह रुग्ण राहणाऱ्या परिसराला रेड जोन मध्ये घेवून कोरोना पॉझेटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील 50 नागरीकांना येथील स्त्री रुग्णालयामध्ये क्वारंटाईन केले आहे. त्यापैकी 24 नागरिकांना कोरोना कक्ष आयसोलेशन कक्षात दाखल करून त्यांचे नमुने घेवून पाठविण्यात आले आहे.या परिसरात नगर परिषदेच्या साहाय्याने रेड जोनच्या परिसरात 40 आरोग्याचे पथक स्थापन करून रेड अलर्ट करण्यात आलेल्या परिसरातील परिवाराची चौकशी करीत आहे.