January 4, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

बुलडाण्यातील बालसुधारगृहातील दोन मुलांची आत्महत्या

बुलढाणा : येथील बालसुधार गृहात रात्रीच्या सुमारास 2 मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार आज सकाळी उघडकिस आल्याने एकच खळबळ उडालीय. बुलढाणा शहरात चिखली रोडवर असलेल्या हाजीमलंग दर्ग्याच्या बाजूला असलेल्या या बालसुधार गृहात इतरही मुले राहतात. त्यापैकी काल रात्रीच्या सुमारास मंगेश डाबेराव वय वर्ष 15 आणि गजानन पांगरे वय वर्ष 17 यांनी राहत असलेल्या रूममधील छताला टॉवेल व चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हे दोघेही दहा दिवसांपूर्वीच बालगृहात आले होते.तसेच दोघेही शेगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.शेगाव येथे दहा दिवसांपूर्वी चोरी केलेल्या गुन्ह्यात आरोपी असलेले दोघांनाही बुलढाणा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. यादरम्यान गजानन पांगरे हा दोन वेळा पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला पुन्हा बालसुधारगृहात आणले. त्या खोलीत एकूण तीन बालआरोपी होते. एक आरोपी झोपेतच असताना या दोघांनी सकाळी ४ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली आहे.सकाळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड केली. तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सदर प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने त्याचाही तपास पोलिस करीत आहे.या दोघांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही.पुढील तपास बुलडाणा पोलीस करत आहे.

Related posts

वर्षभरानंतरही शहिदांचे कुटुंब मदती विना…पुलवामा हल्ल्याची वर्षपूर्ती…शासनाच्या उदानसीनतेची कुटुंबियांना खंत,पाच एकर जमिनीचा वायदा फक्त दप्तरीच..

nirbhid swarajya

दूरदर्शनचे अकोला जिल्हा प्रतिनिधी विशाल बोरे यांना प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार

nirbhid swarajya

राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला शेगावात जंगी सभा

nirbhid swarajya
error: Content is protected !!