कोविड रुग्णालयासाठी टाटा ट्रस्टकडुन सव्वा दोन कोटीचा निधी
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाची दाहकता लक्षात घेता नव्याने तयार केलेली जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे आणि आता या रुग्णालयाला सर्व सुविधायुक्त करण्यासाठी टाटा ट्रस्ट कडून सव्वा दोन कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात रुग्णांची संख्या ही २४ वर जाऊन पोहोचली होती त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय तर २३ जणांवर याच कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते त्यापैकी १९ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत सध्या स्थितीत या रुग्णालयांमध्ये ४ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून अजूनही जिल्ह्यावरील संकट दूर झालेले नाही त्यामुळे या रुग्णालयाला सर्व सोयी सुविधायुक्त करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यासाठी मातृभूमी फाउंडेशन कडून तशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पंधरा दिवसांमध्ये हे रुग्णालय यंत्रसामग्री ने सज्ज होणार आहे.
तर या पंधरा ते वीस दिवसांमध्ये बाजूलाच असलेल्या मूकबधिर विद्यालयामध्ये क्वारंटाईन रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार असून जिल्हा सामान्य रुगणालयात आयसोलेशन वॉर्ड ची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.