व्यक्ती किंवा वाहन शहरात येणार नाही ; प्रशासनाचा निर्णय
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव आलेलाअसल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनानेही ही मोठे पावले उचलीत बुलडाणा शहर सील करण्याचा निर्णय घेतला आहे, यामध्ये बुलडाणा शहरात एकही वाहन किंवा व्यक्ती बाहेरून येणार नाही ही आणि या शहराचा व्यक्ती बाहेर जाणार नाही याची खबरदारी असून घेतल्या जाणार आहे. याशिवाय या शहरासह जिल्ह्यासाठी मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती बुलडाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे.