६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
बुलडाणा : कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत असलेल्या पोलिस कर्मचार्यांचा संपूर्ण देश आणि सर्व समाजघटक गौरव करीत असतांना बुलडाणा शहरातील एका पोलिस कर्मचार्याला गावगुंडांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री ८ वाजेदरम्यान येथील हुसैनिया मस्जीद चौकात घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
बुलडाणा येथील हुसैनिया मस्जीद चौकात पोलिस कर्मचारी राजेश निकाळजे नेमून दिलेली ड्यूटी करीत असताना सोमवारी रात्री ८ वाजेदरम्यान ५ ते ६ जण मोटरसायकलवर फिरतांना निकाळजे यांना आढळले. लॉकडाऊन असतांना आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कालावधी संपलेला असतांना कुणालाही बाहेर पडता येत नाही. त्यातच मोटारसायकलस्वार तरूणांनी तोंडावर कुठलाच मास्क घातलेला नव्हता. त्या तरूणांना हटकले आणि घरी जाण्याचे सांगितले. मात्र त्या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलीय आणि मारहाण केल्याची घटना घडली. बुलडाणा शहर स्टेशनमध्ये मुख्य आरोपी जावेदसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर फरार आहेत.