प्रलंबित असलेल्या रिपोर्ट कडे सर्वांचे लक्ष
बुलडाणा : बुलडाणा मध्ये रात्री उशिरा परत ३ रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव आल्याने आता हा आकडा १५ वर जाऊन पोहोचला आहे त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय तर १४ जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर अजूनही काही रिपोर्ट प्रलंबित असल्याने सर्वांचे लक्ष आता या रिपोर्ट कडे लागले आहेत. तर रुग्ण हे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात आढळून येत असल्याने समूह संक्रमणाचा धोका देखील वर्तवला जात आहे.